T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग

T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग

Cricket World Cup Usa: मायदेशात होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अमेरिकेने आपला संघ जाहीर केला असून त्यात सौरव नेत्रावलकर आणि हरमीत सिंग हे दोन मुंबईकर खेळाडू आहेत. न्यूझीलंडकडून विश्वकरंडक खेळलेल्या कॉरी अँडरसनचाही समावेश करण्यात आला आहे.

T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग
World Cup India Cricket : वर्ल्डकपसाठी संघ निवड एप्रिलअखेरीस

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंक अंतिम सामन्यात ३३ वर्षीय अँडरसन न्यूझीलंडकडून खेळला होता. त्यानंतर त्याने दोन ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे.(t20 squad Usa)

सौरव नेत्रावलकर आणि हरमीत सिंग हे भारताच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतही खेळलेले आहेत. अशाच १९ वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद भारतात संधी मिळत नसल्यामुळे अमेरिकेच्या या संघातून प्रयत्नशील होता; परंतु त्याला तेथेही संधी मिळाली नाही.

T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग
Under 19 Cricket World Cup 2024 : नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य ; १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक,भारत-आफ्रिका आज उपांत्य सामना

मोनांक पटेल (कर्णधार), अॅरॉन जोन्स (उपकर्णधार), स्टीवन टेलर, कॉरी अँडरसन, सौरभ नेत्रावलकर, जेसी सिंग, हरमीत सिंग, नॉश्टुश केन्जिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, नितीश कुमार, अँड्रिज गॉस, शायन जहांगीर, अली खान, निसर्ग पटेल, मिलिंद कुमार

T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग
Under-19 Cricket World Cup : वाद, हिंसा होण्याचा धोका... दक्षिण आफ्रिका क्रिकेटने कर्णधाराला हटवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com