Ramdas Athavale : सावित्रीमाई फुले वसतिगृहातील वार्डनवर कारवाई करा - रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Take action against Savitrimai Phule hostel warden Ramdas Athavale

Ramdas Athavale : सावित्रीमाई फुले वसतिगृहातील वार्डनवर कारवाई करा - रामदास आठवले

मुंबई - चर्नीरोड येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील दलित मुलीच्या झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका वार्डन वर्षा अंधारे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी,

राज्यभरातील सर्व मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेचे ऑडीट करावे आणि शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची सांत्वनपर मदत पिडीत मुलीच्या कुटुंबाला करण्यात यावी, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आज आठवले यांनी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहाला भेट देवून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस आणि माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, रिपाइं युवा महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; एड. आशा लांडगे, एड. अभयाताई सोनवणे आदी उपस्थित होते. एसीपी राजेशसिंह चंदेल आणि पोलीस तपास अधिकारी बांगर, वस्तीगृहाच्या अधिक्षिका वर्षा अंधारे आणि सोनाली मोरेही उपस्थित होते.