esakal | तलासरी येथे आठ लाखांचा मद्यसाठा जप्त; ​डहाणू उत्पादन शुल्क खात्याची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

excise department

तलासरी येथे आठ लाखांचा मद्यसाठा जप्त; डहाणू उत्पादन शुल्क खात्याची कारवाई

sakal_logo
By
संदीप पंडीत

विरार : गणेशोत्सवासाठी (Ganpati Festival) परराज्यातून मद्याचा साठा (Alcohol) कोरोला कार मधून आणण्यात येत असताना याबाबत उत्पादन शुक्ल विभागाला (excise department) माहिती मिळाल्या नुसार सापळा रचून (Trap) उत्पादन शुल्क विभागाने तलासरी बोरगाव येथील दुबळपाडा (dubalpada) या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात जवळपास आठ लाखाचा मद्याचा साठा आणि एक कार (car seized) जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: वसई-विरार : अनधिकृत फेरीवाल्यांना आवरा; महापालिकेपुढे कारवाईचे आव्हान

उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 1488 विदेशी मद्याच्या बाटल्या आणि 1416 मिली क्षमतेचे बियरचे टिन जप्त करण्यात आले आहेत याची किंमत जवळपास सात लाख 93 हजार 200 इतकी आहे. या मध्याच्या पोथ्या बरोबरच एक कोरोला कारही जप्त करण्यात आली आहे . या प्रकरणी विशाल नानूभाई दुबळा वय १९ याला अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महेश धनशेट्टी हे पुढील तपास करत आहे. या कारवाईत पालघर येथील भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेकर, तुळशीराम कुडकर, एस बी आरडेकर , शैलेश शिंदे,किरण धिंदळे , जवान महेंद्र पाडवी, केशव भुरकुंड,कमलेश सानप सहभागी झाले होते.

loading image
go to top