esakal | वसई-विरार : अनधिकृत फेरीवाल्यांना आवरा; महापालिकेपुढे कारवाईचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Hawkers in vasai-virar

वसई-विरार : अनधिकृत फेरीवाल्यांना आवरा; महापालिकेपुढे कारवाईचे आव्हान

sakal_logo
By
प्रसाद जोशी

वसई : वसई-विरार शहर महापालिका (vasai-virar municipal) हद्दीत फेरीवाल्यांची (hawkers) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागात अतिक्रमण (Intrusion) करून आपले बस्तान मांडत आहेत. कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या प्रशासनाच्या अतिक्रमण विरोधी पथकावर (attack on authorities) देखील हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना आवरण्याचा आव्हान प्रशासनासमोर येऊन ठेपले आहे.

हेही वाचा: गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क माफ; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा मोठा निर्णय

वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीत फुटपाथ,रस्त्याच्या कडेला,गर्दीच्या ठिकाणी,मोकळ्या परिसरात कपडे,मोबाईलचे साहित्य,भाजीविक्रेते,फळ यांच्यासह विविध सामान विकणारे विक्रेते बसतात.त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल होते तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानांना त्रास सहन करावा लागत आहे.कोंडी निर्माण होत असते वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो.कोरोनाच्या नियमांना देखील पायाखाली तुडवले जात आहे तर जे परवानाधारक फेरीवाले आहेत त्यांना अधिकृत[पणे जागा निश्चित केली आहे मात्र त्या व्यतिरिक्त अनधिकृत फेरीवाल्यांविषयी पालिकेने धोरण अवलंबविले नाही.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईसाठी पथक जात असते मात्र त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.त्यातच सातिवली,वसई परिसरात पथकावर हल्ले देखील करण्यात आले होते.तर कोरोनाकाळात देखील कारवाईसाठी गेलेल्या पथकाला मारहाण करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते परंतु अनेक फेरीवाल्याने त्यानंतर देखील कारवाई पथकाशी वाद घालत असतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण; 233 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

पालिका प्रशासनाने याकडे मात्र तितक्या गांभीर्याने घेतले नाही पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून महिला देखील कार्यरत आहेत त्यामुळे त्यांना देखील भीतीच्या सावटाखाली रहावे लागत आहे. ठाण्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला पाहता वसई विरार शहर महापालिकेने पथक व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपायोजना करून,फेरीवाला धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.

विरार येथील स्टेशन परिसर,स्कायवॉक खाली तसेच जीवदानी मार्ग,चंदनसार,मनवेलपाडा तर नालासोपारा तुळींज,सेंट्रलपार्क,आचोळे,संतोषभुवन,नगिनदासपाडा,पश्चिम पादचारी पुलाजवळ,वसई आनंद नगर,अंबाडी मार्ग,माणिकपूर मार्ग,नवघर पूर्व रेल्वे स्थानक परिसर, नायगाव पूर्व या मुख्य रहदारीच्या ठिकाणी तसेच अंतर्गत मार्गावर देखील फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. कोरोना काळात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे महापालिका प्रशासनाची फेरीवाला धोरण मोहीम बासनात गुंडाळली गेली असल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे फेरीवाल्यांचे नाव, पत्ता, हाताचा अंगठा ,डोळ्याचे स्कॅनिंगअशी पद्धत राबवून जागा दिली जाणार होती मात्र जैसे थे परिस्थिती आहे.

loading image
go to top