Panvel Metro: पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री! तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गामुळे शहराचा कायापालट होणार

Panvel Metro: तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिकेमुळे शहराचा कायापालट होणार आहे. तसेच रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ यांची त्रिसूत्री जोडणीमुळे पनवेल परिसर ट्रान्झिट आणि लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.
Panvel Metro

Panvel Metro

ESakal

Updated on

पनवेल : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विकासाचा वेग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढताना दिसत आहे. औद्योगिक विस्तार, वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावर उभे राहत असलेले गृहप्रकल्प आणि उभारणीच्या टप्प्यात असलेले नवी मुंबई विमानतळ यामुळे पनवेल परिसर महाराष्ट्राच्या विकास नकाशावर केंद्रस्थानी येत आहे. अशा परिस्थितीत तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ यांची त्रिसूत्री जोडणी तयार होणार आहे. त्यामुळे पनवेल हा परिसर महत्त्वाचा ट्रान्झिट आणि लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com