मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

Mumbai Water Scarcity: महापालिकेकडून पाणी विकत घेत टँकरमाफिया जादा दराने पाणी विकत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा टँकरमाफियांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
Water Tanker mafia Scam

Water Tanker mafia Scam

ESakal

Updated on

मुंबई : कडक उन्हात कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठ्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. महापालिकेकडून अडीच हजार रुपयांत पाणी विकत घेत टँकरमाफिया १० हजार रुपयांत पाणी विकतात, टँकरमाफिया आणि पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत आहे, असा आरोप मंगळवारी (ता. १७) पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी केला. नगरसेवक रितेश राय यांनी ‘६६ ब’अंतर्गत पाण्याचा मुद्दा उपस्थित केला, याच वेळी सभागृहात पाणीप्रश्नावर बोलू न दिल्याने काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com