तनुश्री दत्ता म्हणते नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

मुंबई : #MeToo च्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप लावलेत. याबद्दल अभिनेत्री तनुश्री दत्ताने  केस बद्दल, त्याचबरोबर तनुश्रीच्या सहकार्यांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांबद्दल माहिती देण्यासाठी वकिल नितीन सातपुते यांच्यासोबत माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतलीये. 

मुंबई : #MeToo च्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप लावलेत. याबद्दल अभिनेत्री तनुश्री दत्ताने  केस बद्दल, त्याचबरोबर तनुश्रीच्या सहकार्यांबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांबद्दल माहिती देण्यासाठी वकिल नितीन सातपुते यांच्यासोबत माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतलीये. 

मोठी बातमी - 'त्या' जाहिरातीनंतर शिवप्रेमींकडून अक्षय कुमारची 'धुलाई'    

अभिनेता नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी दिलासा देत अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दाखल केलेल्या विनयभंगच्या तक्रारीमधून पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली होती. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या 'बी समरी' अहवालात ओशिवारा पोलिसांनी स्पष्ट केले होते की, नाना पाटेकर यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्याएवढे पुरावे नाही. याच बी-समरी अहवालावर तनुश्रीच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय. 

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या वकिलांवरदेखील पुरावे नष्ट करण्याचे आरोप देखील केलेत. नाना पाटेकर यांनी मनसेच्या गुंडाना सिनेमाच्या सेटवर बोलावून गोंधळ घातला आणि नृत्यदिग्दर्शक गणेश आश्चर्याने माझं करिअर उध्वस्त केल्याचा आरोप तनुश्रीने केलाय. याबाबत आता तनुश्रीला कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. 

मोठी बातमी : अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरून खटके ?

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू अशा शब्दांत अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकवर यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. याचसोबत नाना पाटेकर यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप देखील केलाय. नाम फाउंडेशनच्यानावाखाली परदेशातून देवड्याघेण्याचं काम सुरु असल्याचं तनुश्री म्हाणालीये. परदेशातून आलेला सर्व पैसे जातो कुठे ? गरिबांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढला की यांचं काम झालं, असं देखील तनुश्री म्हाणालीये. कोल्हापुरात ५०० घरे बांधून देण्याचं काम कुठवर आलंय हे कुणी जाऊन पाहिलंय का असा सवाल देखील तनुश्री दत्ताने या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. 

 

tanushree dutta says actor nana patekar is another aasaram bapu


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanushree dutta says actor nana patekar is another aasaram bapu