Tarapur Industrial Area : तारापूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी आग; निरलॉन कंपनीमागील गवत आणि विराज प्रोफाइलच्या लाईम स्टोअरला भडका

Two Fire Incidents Reported in Tarapur Industrial Area on the Same Day : तारापूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. निरलॉन कंपनीमागील सुक्या गवताला रासायनिक कचऱ्यामुळे आग भडकली, तर विराज प्रोफाइल कंपनीच्या लाईम स्टोअरमध्येही दुपारी आग लागली.
Two Fire Incidents Reported in Tarapur Industrial Area on the Same Day

Two Fire Incidents Reported in Tarapur Industrial Area on the Same Day

esakal

Updated on: 

संतोष घरत

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोमवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास निरलॉन कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या सुक्या गवताला आग लागली. परिसरात साचलेल्या रासायनिक कचऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरल्याने आसपासच्या कंपन्यांमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सोमवारी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी उघड्यावरील कचऱ्याला आग लागली, तर दुसरी घटना विराज प्रोफाइल कंपनीच्या प्लॉट क्रमांक G-2 येथील लाईम स्टोअरमध्ये घडली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

Loading content, please wait...