मुंबई : पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू | Tardeo police Station | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Set him on fire

मुंबई : पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घर सोडून गेलेली बायको (wife) पोलीस स्टेशनमध्ये आलीय, हे कळताच एका तरुणानं स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवून (set him on fire) घेतल्याची घटना ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये (Tardeo Police station) घडली. त्याला नायर हॉस्पीटलमध्ये (Admitted in Nair hospital) दाखल करण्यात आल्यानंतर आज त्याचा मृत्यू (husbund death) झालाय. सर्वजीत मोरे (Sarvajit More) असं त्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा: जीप-दुचाकी अपघातात दोघे ठार; सायन-पनवेल मार्गावरील घटना

2020 मध्येच त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर मात्र नवरा बायकोत कायम भांडणं होत होती. दोन दिवसांपूर्वी आपली बायको घर सोडून गेल्याची तक्रार त्यानं ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध घेऊन तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले, तिचा जबाब नोंदवला जात असतानाच तिचा पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. तो बाहेरुनच स्वत:वर रॉकेल ओतून आला होता. त्याने आत येऊन स्वत:लाच आग लावली.

तिथं हजर राहणाऱ्या पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, आग विझवली, मात्र तोपर्यंत तो बराच भाजला होतां. नंतर पोलिसांनी त्याला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल केलं. आयसीयुत उपचार घेत असताना आज त्याचा मृत्यू झाला. हा तरुण ताडदेव पोलीस कॉलनीत रहात होता अशी माहीती आहे.

loading image
go to top