
गर्भाशय कर्करोग ग्रस्त महिलांना दिलासा; टाटा रुग्णालाकडून तंत्रज्ञानाचा वापर
मुंबई : गर्भाशयाच्या कर्करोगाने (cancer) ग्रस्त महिलांचे दुःख कमी करण्याचा मार्ग टाटा रुग्णालयाच्या (Tata hospital) डॉक्टरांनी शोधला आहे. ऑपरेशननंतर, सुमारे 20 टक्के स्त्रियांना रेडिएशन थेरपीची ( women's radiation therapy) आवश्यकता असते, मात्र, स्त्रियांना जुन्या रेडिएशन थेरपी प्रक्रियेमुळे अनेक प्रकारच्या दुष्परिणामांमधून जावे लागले. परंतु टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी इमेज गाईडेड इंटेंसिव्ह मॉड्युलेटेड रेडिओथेरपी (IG-IMRT) च्या तंत्रज्ञानाचा वापर करत स्त्रियांवर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता जवळपास कमी केली आहे.
सध्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर एकापेक्षा एक अभ्यास करून जगासमोर रूग्णांच्या उत्तम उपचारांसाठी मार्गदर्शन करत आहेत. यावेळी टाटा रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागाने असा अभ्यास केला आहे, ज्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांच्या वेदना कमी होणार आहेत. टाटा रुग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक डॉ. सुप्रिया चोप्रा यांनी सांगितले की, दरवर्षी देशातील 90,000 महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होतात. यापैकी 20 हजार ते 30 हजार महिलांना शस्त्रक्रियेनंतर रेडिओथेरपीची आवश्यकता असते.
जेव्हा जुन्या पद्धतीद्वारे रेडिओथेरपी दिली जाते, तेव्हा ती त्या अवयवांव्यतिरिक्त इतर अवयवांवरही परिणाम करते, ज्यामुळे स्त्रियांना बर्याच प्रकारच्या शारीरिक समस्यांना बराच काळ सामोरे जावे लागते. त्यानंतर रेडिओथेरपीसाठी IG-IMRT तंत्र आले. या तंत्राला येण्यास 10 ते 12 वर्षे लागली, परंतु ती गर्भाशयासाठी वापरली गेली नाही. आम्ही हे तंत्र वापरले आणि आता आढळले की स्त्रियांमध्ये रेडिएशनच्या दुष्परिणामांचे पुरावे नगण्य आहेत. जगातील हा पहिला अभ्यास आहे, म्हणजेच टाटा डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासानंतर इतर देश रुग्णांवर उपचार करू शकतात आणि गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांचे दुःख कमी करू शकतात. हा अभ्यास जगप्रसिद्ध 'जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी' (अमेरिकन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी) मध्ये प्रकाशित झाला आहे.
97% स्त्रियांमध्ये कोणताही दुष्परिणाम नाही
"या अभ्यासात गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या 300 स्त्रियांचा समावेश केला गेला ज्यांना रेडिओथेरपीची आवश्यकता होती. IG-IMRT तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडिएशन केवळ कर्करोगग्रस्त भागात पोहोचते आणि त्याचा इतर अवयवांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आम्हाला आढळले की 97 टक्के महिलांना कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. या तंत्राच्या मदतीने महिला सामान्य जीवन जगू शकतात."
- डॉ. सुप्रिया चोप्रा, प्रा. रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, अॅक्ट्रेक टाटा मेमोरियल रुग्णालय