कोरोनाशी लढ्यासाठी टाटा मोटार्सदेखील मैदानात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

देशभरात फैलावत चाललेल्या कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी टाटा मोटर्स कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

मुंबई : टाट मोटार्स कंपनीतर्फे कंत्राटी कामगार, लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले नागरिक, झोपडीवासी, मदत छावण्यांतील व्यक्ती, ग्रामस्थ, वाहनचालक, सुरक्षा दले आदींना जेवण व अन्नधान्याची हजारो पाकिटे पुरवण्यात आली आहेत. पुण्यातील 19 पोलिस चौक्‍यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रकचालकांची आरोग्य तपासणी, झोपडपट्ट्यांत आरोग्याबाबत जनजागृती आदी उपक्रम राबवले जात आहेत. बचत गटांनी बनवलेले 17 हजार मास्क रुग्णालये, विक्रेते, पोलिसांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयांना एन-95 मास्क, सॅनिटायझर व वैयक्तिक सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आली आहेत. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एबी इनबेव्हचा हातभार 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांबद्दल एबी इनबेव्ह कंपनीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कंपनीतर्फे महाराष्ट्र, हरियाना व दिल्लीत 30 हजार लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले असून, महाराष्ट्रासाठी 25 हजार एफएफपीटू मास्क दिले आहेत. या मदतीचा या तीन राज्यांमधील 15 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असे कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Motors' initiative to fight Corona