Mumbai Electricity: मुंबईकरांना टाटांचे मोठे गिफ्ट! ८ लाख घरात लावला हरित ऊर्जेचा दिवा
Tata Power: टाटा पॉवरने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ८ लाख ग्राहकांना हरित ऊर्जेचा पुरवठा केला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे.
मुंबई : मुंबापूरीतील टाटा पॉवरच्या ४० टक्के ग्राहकांच्या घरात हरित (अपारंपरिक) ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौर, पवन आणि लघु जलविद्युत प्रकल्पात तयार होणाऱ्या वीज प्रकल्पातील विजेचा प्रकाश आहे.