
मुंबई : अपारंपारिक ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी टाटा पॉवरची सह कंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएब्लने एप्रिल-जून या तीन महिन्यात तब्बल ४५ हजार ५८९ घरांच्या छतावर रूफ टॉप सोलर पॅनल उभारले आहेत. त्याची क्षमता तब्बल २२० मेगावॉट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संबंधित घरातील वीज बिल कमी होणार असून दिवसा तयारी होणारी वीज ग्रीडमध्येही टाकणे शक्य होणार आहे.