मुंबईत वरळी कोळीवाडा, दादर हिंदमाता भागात पाणी भरलं

मुंबईत वरळी कोळीवाडा, दादर हिंदमाता भागात पाणी भरलं

Tauktae Cyclone Updates : केरळ, कर्नाटकपाठोपाठ तौत्के चक्रीवादळाचा तडाखा अखेर रविवारी (ता.१६) महाराष्ट्र, गोवा या राज्यांना बसला. अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले असून हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई जाणवू लागला. वादळ पुढे सरकेल तसे मुंबईत जोरदार वारे देखील बघू शकतील, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. (Tauktae Cyclone Updates know situation in mumbai)

'तौत्के' चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवत आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईच्या किनारपट्टीपासून १५० किमी अंतरावर असणारे हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार आहे. मुंबईत जोरदार वारे वाहत असून रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा वेग वाढण्याची शक्यता असून आतापर्यंत कुठेही पाणी साचलेले नाही असे पुणे एसआयडीचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी सांगितले.

- कुलाबा, कफपरेड, फोर्ट, गिरगाव, मलबार हिल, ग्रांटरोड, ताडदेव, कुंभारवाड़ा, नागपाडा, आग्रिपाड़ा, जेजे, माझगाव, चारनळ, नळ बाजार, डोंगरी, मशिद बंदर परिसरातील काही सखल भागात पाणी भरले आहे.

सीपी टँक माधवबाग येथे कोसळलेला वृक्ष.
सीपी टँक माधवबाग येथे कोसळलेला वृक्ष.
धारावतील सखल भागात पाणी साचले
धारावतील सखल भागात पाणी साचले

पाहा मुंबईत कुठे काय आहे स्थिती -

- चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी नौदलाची बचाव पथके आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे, तसेच तुफानी वारे वाहत आहेत. त्या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रसंग उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी मुंबईत कुलाबा, वरळी, घाटकोपर, मानखुर्द, मालाड येथे नौदलाची पूरपरिस्थितीसाठीची बचाव आणि मदत पथके सज्ज आहेत.

मध्य रेल्वे धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत

मध्य रेल्वेच्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान सकाळी ०९:१० वाजता झाडाची फांदी कोसळून लोकल सेवा बाधित झाली होती. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती. आता हे पडलेलं झाड तिथून हटवण्यात आलंय. ११:१० वाजता मार्ग पूर्ववत सुरू झाला आहे

मध्य रेल्वेच्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान सकाळी ०९:१० वाजता झाडाची फांदी कोसळून लोकल सेवा बाधित झाली होती. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती. आता हे पडलेलं झाड तिथून हटवण्यात आलंय. ११:१० वाजता मार्ग पूर्ववत सुरू झाला आहे

- मुंबईत सुरू असलेल्या मोनोरेलचे काम थांबवले आहे. मोनोरेलचे काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

- दादर हिंदमाता मध्ये पाणी भरलं. वाहतुक मंदावली आहे. नागरिक पाण्यातून वाट काढत जातायत. वाहतूक वळवण्यात आलीय.

- चक्रीवादळाच फटका सध्या मुंबईतील समुद्र किनारी राहणाऱ्या राहिवाश्याना बसलाय. वरळी कोळीवाड्यातील अनेक रहिवासी गल्ल्या या पाण्याने भरल्यात. तर काहींच्या मोरीतून पाणी घरी येत असल्याचे त्यांनी सांगितलंय.

- "ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

- तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत असून घाटकोपर-विक्रोळी दरम्यान एका लोकल ट्रेनवर झाडाची फांदी कोसळली. माटुंगा-मुलुंड मार्गावर धीम्या मार्गावरील गाडया फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

- राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.

- वरळी सी फेसवर झाड पडल्याने एका मार्गावरची वाहतूक बंद आहे

- चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर ३ तास विमानतळ सेवा बंद राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत विमानतळ सेवा बंद ठेवली जाणार आहे.

- काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत मुंबई शहरात सरासरी ८.३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- पूर्व उपनगरात ६.५३ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ३.९२ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

- मुंबईत झाड कोसळण्याच्या ३४ घटना घडल्या आहेत. शहरात ११ तर उपनगरात १७ झाडं कोसळली.

- पश्चिम उपनगरात NDRF च्या तीन टीम्स सज्ज आहेत.

- मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यावर फायर ब्रिगेडच्या सहा टीम्स सज्ज आहेत.

- वादळामुळे आज मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे.

- मुंबईत चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रविवारी रात्रीपासून 39 वाहतूक पोलिसांची पथक तैनात करण्यात आली आहेत.

- रात्रीपासून वांद्रे-वरळी सिलिंक हा परिस्थितीनुसार बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे.

- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 580 कोरोना रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

- मुंबईकर अवकाळी पावसामुळे हंगाम नसलेल्या मोसमात छत्र्या-रेनकोट घालून फिरतायत

- वारा देखील असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी लावलेले रस्त्यावरील बॅरिगेत उडून बाजूला पडले आहेत

- शिवाजी पार्कात एक झाड रस्त्यावर पडलय. त्यामुळे वरळीला जाणारा रस्ता बंद आहे . एकमार्गिका सुरू ठेवण्यात आलीय.

- २४ तासात शॉर्ट सर्किटच्या दोन घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वांद्रे कोविड केअर सेंटरला फटका बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com