Ration Card
sakal
उल्हासनगर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत धान्यपुरवठा बंद करण्यात येत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या शहरातील शिधापत्रिकाधारकांना नियमांचा मोठा फटका बसला आहे. कुटुंबातील एकाच सदस्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरले आणि ते अगदी झीरो रिटर्न असले तरी संपूर्ण कुटुंबाचा स्वस्त धान्याचा लाभ धोक्यात येतो. उल्हासनगरमध्ये अशा तब्बल सात हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, आणखी साडेचार हजार शिधापत्रिकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.