क्षयरोग रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू नैसर्गिकच! घातपात नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

क्षयरोग रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू नैसर्गिकच! घातपात नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

मुंबई ः शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात सापडलेल्या 27 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून त्याचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सुमारे 14 दिवस हा मृतदेह असाच शौचालयात पडून होता. 

या मृत्यूमागे कोणताही घातपात नसला तरी 14 दिवस मृतदेह तसाच पडून राहिला होता. त्यात हलगर्जीपणा असून, याबाबतचा अहवाल शिवडी येथील रफी किडवाई (आरएके) मार्ग पोलिस लवकरच वरिष्ठांना सुपूर्त करणार आहेत. त्याची प्रत पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात येणार आहे. 

रुग्ण सूर्यभान यादव याचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्याचसोबत याप्रकरणी तपासाला सुरुवात केली होती. वैद्यकीय अहवाल व रुग्णाचा वैद्यकीय इतिहासही पोलिसांनी तपासला. याशिवाय सुमारे दहाहून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. त्यावरून यादव याचा मृत्यू नैसर्गिकच असून, त्या मागे कोणताही घातपात नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले आहेत. यादव याच्या मृत्यूबाबत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. यादव 4 ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होता. त्यानंतर 18 ऑक्‍टोबरला त्याचा मृतदेह सापडला. या काळात शौचालयांची तपासणी केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला. ती बाब अहवालात नमूद आहे. 

सूर्यभान यादव 30 सप्टेंबरला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल घेऊन शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. 4 ऑक्‍टोबरला हा रुग्ण बेपत्ता झाल्याचे समजले. त्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत दिली. त्यानंतर तब्बल 14 दिवसांनी म्हणजे कोरोना रुग्णांच्या वॉर्डजवळील शौचालयात मृतदेह आढळला; परंतु चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविता येत नव्हती. हा मृतदेह विच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविला. मृत्यू नैसर्गिक असून आत्महत्या नाही, असे केईएम रुग्णालयातून दिलेल्या अहवालात स्पष्ट केले होते. 

TB hospital patient dies naturally Police investigation concluded that there was no ambush

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com