

अंबरनाथमध्ये एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाला पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांसोबत या शिक्षकाने अशा प्रकारचा लज्जास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे.