नवीन निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंत एक ते २० पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक व नंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार विद्यार्थी संख्या उपलब्ध झाल्यास सेवानिवृत्त शिक्षक देण्यात येणार आहे.
अलिबाग : राज्य सरकारने या वर्षी नव्याने केलेल्या शिक्षक संच मान्यतेमुळे राज्यभरात हजारो शिक्षकांमध्ये अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. सुधारित संचमान्यता निकषाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने (Maharashtra State Teachers Council Primary Department) विरोध केला आहे. ग्रामीण भागात कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट या माध्यमातून घातला जात असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.