BIG NEWS : मुंबईतील आमदार होस्टेलच्या बिल्डिंगवरून शिक्षकाचा आत्महत्येचा इशारा

सुमित बागुल
Wednesday, 16 September 2020

पंधरा वर्षांपासून वेतन रखडलं असल्याने या शिक्षकाने आत्महत्येचा इशारा दिलाय

मुंबई : मुंबईतील मंत्रालयाच्या नजीकच असणाऱ्या आमदार हॉस्टेल इमारतीवरून एका शिक्षकाने आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय. गजानन खैरे असं या शिक्षक व्यक्तीचं नाव आहे. मंत्रालयाच्या बाजूला, त्याचबरोबर आकाशवाणीकेंद्राच्या नजीक आमदार हॉस्टेल आहे. त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खिडकीतून उतरून, दोन फ्लॅट्समध्ये ही शिक्षक व्यक्ती उभी आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमदार होस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून या शिक्षकाने आत्महत्येचा इशारा दिलाय.

मोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

काय आहेत मागण्या : 

पंधरा वर्षांपासून वेतन रखडलं असल्याने या शिक्षकाने आत्महत्येचा इशारा दिलाय. सदर शिक्षकाचं नाव गजानन खैरे आहे. कोरोना काळात आम्हाला नोकरी मिळाली नाही,  आमच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीत. गेले पंधरा वर्ष ते शिक्षक म्हणून काम करतायत. मात्र गेले पंधरा वर्ष पगार मिळालेला नाही. या मागणीसाठी अनेकांना भेटलो, निवेदन दिलीत. मात्र अजूनही याप्रकरणी अजून तोडगा निघालेला नाही. म्हणून गजानन खैरे याने थेट बिल्डिंगच्या खिडकीतून उतरून आत्महत्येचा इशारा दिलाय.   

दरम्यान, सदर शिक्षक व्यक्तीला समजावून त्यांनी खाली यावं सांगण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे स्वतः घटनास्थळी दाखल झालेत.

teacher named gajanan khaire attempts to finish his life for not getting salary for fifteen years

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher named gajanan khaire attempts to finish his life for not getting salary for fifteen years