Teacher Recruitment New Rules On Pavitra Portal
Esakal
मुंबई : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे या पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी नवीन सुधारित नियम लागू होतील. यात निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळ निवडीच्या शिफारशीच लागू होतील. यामुळे आतापर्यंत पोर्टलवर असलेल्या निवडीसंदर्भातील तांत्रिक चुकांचा शालेय शिक्षण विभागासह शाळांनाही होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळणार असून, भरती प्रक्रिया सुलभ होणार आहे.