esakal | कल्याणमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Day

कल्याणमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिक्षक दिनाचे (teachers day) औचित्य साधत कल्याणमध्ये (kalyan) डॉक्टरांच्या संघटनेने (doctors union) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण (IMA) आणि कल्याण रेडिओलॉजिस्ट संघटनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रा. अशोक प्रधान (Ashok Pradhan) यांच्या हस्ते शिक्षणाच्या कार्यासह सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षिकांना पुरस्कार (Awards For teachers) देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा: जव्हारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा; लसीचा मात्र तुटवडा

बिर्ला महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना जांगरा, बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार, आसनगाव जिल्हा परिषद शाळेच्या सरिता काळे, टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्थेच्या अक्षता भोसले, सामाजिक कार्यकर्त्या शशी शेट्टी यांचा आयएमए कल्याणकडून कै. मधूलिका कक्कर शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील मुलांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. हरीश शहाददपुरी, डॉ. संदेश रोठे यांच्यासह डॉ. सुरेखा इटकर, डॉ. अश्विन कक्कर, प्रवीण शेट्टी

आदी मान्यवर उपस्थित होते.

loading image
go to top