जव्हार मध्ये महिला सक्षमीकरणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

जव्हार च्या रजपूत सभागृहात ऊध्योजकता विकास द्वारा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जव्हार मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिता लांडे व सत्कार्य सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे सचिव अशरफ घाची उपस्थित होते.

मोखाडा -  महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई आणि सत्कार्य शैक्षणिक, सामाजिक-आर्थिक विकास संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार च्या रजपूत सभागृहात ऊध्योजकता विकास द्वारा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तज्ञांनी स्वयंसहाय्यता व महिला बचत गटातील महिलांना सक्षमीकरणाचे धडे देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

जव्हार च्या रजपूत सभागृहात ऊध्योजकता विकास द्वारा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जव्हार मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिता लांडे व सत्कार्य सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे सचिव अशरफ घाची उपस्थित होते. या मेळाव्यात स्वयंसहाय्यता व महिला बचत गटातील महिलांना अॅड. अनिता फलटणकर यांनी महिलांसाठी बचत गटाचे महत्त्व तसेच कायदे विषयक मार्गदर्शन केले. लता रावळ यांनी बचत गट व रोजगाराच्या संधी आणि महिला सुरक्षासाठी दक्षता समितीचे कार्य या विषयी माहिती दिली. तर डॉ. अनिल पाटील यांनी उद्योजक कसा असावा ?  उद्योजकाचे गुण काय असतात या विषयी मार्गदर्शन केले आहे. 

मेळाव्यात जव्हार मधील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनिषा वाणी, हुसेन भाई, तुषार लांडे आणि फरीन यांनी विशेष परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachings of women empowerment in Jawhar