भातसा वीज निर्मिती केंद्रात बिघाड; मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बसणार फटका | Mumbai Water Supply Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

भातसा वीज निर्मिती केंद्रात बिघाड; मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बसणार फटका

मुंबई : भातसा वीज निर्मिती केंद्रात (Bhatsa power generator plant) पाणी शिरुन बिघाड झाल्याने पुढील काही दिवस मुंबईला (Mumbai) 15 टक्के कमी पाणी पुरवठा होणार आहे. भातसा वीज केंद्रात 27 फेब्रुवारी रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठ्यावर (water supply) परीणाम झाला होता. अद्याप वीज केंद्रातील दोष दूर झालेला नाही. यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होऊ शकत नाही. तोपर्यंत मुंबईला (Mumbai) 15 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार.

मुंबईला रोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यातील 1700 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मात्र, सध्या धरणातून पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याने मुंबईला 15 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरणावर 15 मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाते. या वीजनिर्मिती केंद्रात रविवारी पाणी शिरल्याचा प्रकार घडला. सुदैवाने यावेळी कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून वेळीच व्हॉल्व्ह बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र तोपर्यंत वीजनिर्मिती केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने वीजनिर्मिती आणि मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

पर्यायाचा विचार

धरणाचे दुसरे दरवाजे खोलून पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते याबाबतही चाचपणी सुरू आहे. मात्र तोपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याची लेव्हल मेंटेन करून 15 टक्के पाणीकपात करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbai NewsWater supply