KEM रुग्णालयात भीतीचं वातवरण, कारण कोरोनाने घेतलाय 'त्यांचा'ही जीव...

समीर सुर्वे
Saturday, 18 July 2020

केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.

मुंबई : केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. केईएम रुग्णालयात 16 मोबाईल ऑपरेटची आवश्यकता असताना सध्या केवळ 5 जण याठिकाणी सुट्टी न घेता काम करत होते. त्यांच्या मदतीसाठी दोन दिव्यांग पाठविण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर पाच मधील एकाला अन्य आजार असल्यामुळे ते कामावर येत नव्हते. त्यामुळे सध्या हे चार जण आपली भूमिका निभावत होते. 

28 जून रोजी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याच सोबत अन्य सर्व ऑपरेटरचीही कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात हे चार ऑपरेटर आणि मदतीसाठी येत असलेल्या एका दिव्यांग ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली. आणि सर्व ऑपरेटरच्या पायाखालची जमीन सरकली. त्यातच एका (57) वर्षीय टेलिफोन ऑपरेटरला अन्य आजार असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या ऑपरेटरचा मृत्यू झाला.

मोठी बातमी मुंबईकरांना दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच; धरणांतील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ नाहीच

यापूर्वी बऱ्याचदा टेलिफोन ऑपरेटर्सची संख्या वाढवावी यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिष्ठात्यांना निवेदने दिली आहेत. मात्र अजूनही ऑपरेटरची संख्या काही वाढविण्यात आली नाही. रुग्णांलयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या पालिका कामगार सेनेचे उपाध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिला.

( संकलन - सुमित बागुल )

telephone operator of KEM hospital mumbai passes away due to covid


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telephone operator of KEM hospital mumbai passes away due to covid