मुंबई, ठाणेकरांनो स्वेटर, जॅकेट काढून ठेवा! सोमवारपासून थंडी वाढणार

सुमित बागुल
Saturday, 19 December 2020

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई ठाणेकरांनी हिवाळ्यात पावसाळा म्हणजेच हिवसाळा अनुभवाला होता

मुंबई : मुंबई,  ठाणेकरांनो तयार राहा, कारण येत्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात सोबतच कोकणात तापमानात मोठी घट होणार आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

"येत्या सोमवारपासून कोकण विभाग सोबतच मुंबई आणि ठाण्यात तापमान १८ ते २० अंश सेल्सियस तर इंटिरियर भागात तापमान १२ ते १४ अंश सेल्सियस इतकं खाली उतरण्याची शक्यता आहे." असं होसाळीकर म्हणालेत. 

हेही वाचा : सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, सामाजिक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरु

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई ठाणेकरांनी हिवाळ्यात पावसाळा म्हणजेच हिवसाळा अनुभवाला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा अवकाळी पाऊस झालेला. पावसामुळे तापमान कमी झालेलं. मात्र कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा तापमानात काही अंशी वाढ झल्याचं पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबई ठाण्यातील तापमान कमी होणार आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवायला सुरवात  झाली आहे. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान , हरियाणा या भागात तापमानाचा पारा खाली आलाय. तर येत्या काही दिवसात पंजाब , हरियाणा आणि चंदिगढमध्ये तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे आहे.  

temperature in mumbai thane and konkan range to drop in coming days K S Hosalikar  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temperature in mumbai thane and konkan range to drop in coming days K S Hosalikar