
Dadar Accident
ESakal
मुंबई : दादर येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यानासमोरील बस थांब्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास बेस्ट, टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनांत विचित्र अपघात घडला. त्यात एक प्रवासी ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. अपघात घडला तेव्हा टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक संजय कुंभार(२७) दारूच्या नशेत होता. अपघातानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.