नवी मुंबईत बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त घरे; सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रतिपादन

सुजित गायकवाड
Monday, 19 October 2020

भविष्यात सिडकोतर्फे विक्रीसाठी उपलब्ध होणारी घरे ही बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त असतील, असे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. "कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात ते बोलत होते. 

नवी मुंबई : कोरोनामुळे रियल इस्टेट क्षेत्रात निर्माण झालेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी सिडकोची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात सिडकोतर्फे विक्रीसाठी उपलब्ध होणारी घरे ही बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी स्वस्त असतील, असे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. "कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात ते बोलत होते. 

ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, ग्राहकांचा पासवर्ड चोरून खात्यावर डल्ला

कोरोनामुळे नागरिकांच्या मागण्या बदलल्या असून नवी आव्हाने उभी राहिली आहेत. सिडको या नव्या आव्हानांना सामोरे जाऊन बाजारात एक नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्‍वास मुखर्जी यांनी व्यक्त केला. सध्या महामुंबई परिसरात सिडकोतर्फे तब्बल दोन लाख घरे तयार केली जात आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात एक लाख दहा हजार घरांच्या बांधकामांना सुरुवात झाली आहेत. खांदेश्‍वर, मानसरोवर, खारघर, सीबीडी-बेलापूर, नेरूळ, वाशी आदी रेल्वेस्थानकांच्या वाहनतळांवरील जागेत ही घरे उभारली जाणार आहेत. याव्यतिरिक्त ट्रक टर्मिनल्सच्या मोकळ्या जागांचाही वापर गृहप्रकल्प उभारण्यासाठी केला जाणार आहे.

या प्रकल्पांची संरचना तयार झाली असून हळूहळू प्रत्यक्ष पायाभरणीच्या कामाला सुरुवात होत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सर्व बांधकामे ठप्प पडली होती; परंतु आता कामाला सुरुवात झाली आहे. सध्या बहुतांश लोक घरातूनच काम करण्याला प्राधान्य देत असल्याने नागरिकांच्या घराबाबतच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. अशा बदलांना सामोरे जाऊन पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची घरे माफक किमतीत देण्याची जबाबदारी सिडको पार पाडेल, असा विश्‍वास मुखर्जी यांनी व्यक्त केला. सिडकोकडून भविष्यात काढल्या जाणाऱ्या घरांच्या लॉटरीत घरांची आकारणारी किंमत ही बाजारभावापेक्षा दहा लाख रुपयांनी कमी असणार आहे. सिडकोचा हा निर्णय रियल इस्टेट क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड ठरेल, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले. 

"कॉरिडॉर'मुळे मुंबईकरांवर वीज वितरणाचा 8 हजार कोटींचा भार!  महापारेषण देणार नियामक आयोगाला प्रस्ताव

अटींचा घोळ मिटणार 
सिडकोच्या घरांसाठी पात्र होण्यासाठी आवश्‍यक नियमावली आणि त्याच घरावर बॅंकेतून कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता या परस्पर विरोधी असतात. त्यामुळे सिडकोच्या लॉटरीत घर लागून सुद्धा फक्त कर्जास पात्र न ठरल्याने अनेकांचे घरांचे स्वप्न अधुरे राहते. सहव्यवस्थापकीय संचालक दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ सल्लागार समितीमार्फत हे प्रश्‍न सोडवण्यात येईल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh rupees cheaper than the market price in Navi Mumbai; CIDCO Managing Director Dr. Statement by Sanjay Mukherjee