esakal | ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, ग्राहकांचा पासवर्ड चोरून खात्यावर डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, ग्राहकांचा पासवर्ड चोरून खात्यावर डल्ला

 ग्राहकांचे पासवर्ड चोरून त्याचा गैरवापर करणा-या प्रसिद्ध ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचा-याला राज्य सायबर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी कर्मचा-याला एक साथीदार असून तो आरोपीला या पासवर्डच्या सहाय्याने दुस-याच्या खात्यातून कसे पैसे काढता येतात.

ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक, ग्राहकांचा पासवर्ड चोरून खात्यावर डल्ला

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई:  ग्राहकांचे पासवर्ड चोरून त्याचा गैरवापर करणा-या प्रसिद्ध ई-वॉलेट कंपनीच्या कर्मचा-याला राज्य सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपी कंपनीचा सेल्स एक्झिकेटीव्ह असून अॅप्लिकेशनमधील त्रुटी दुरुस्त करण्याच्या नावाखाली तो पासवर्ड रिसेट करायचा आणि त्यानंतर ग्राहक नवीन पासवर्ड टाकत असताना पाहून त्या पासवर्डच्या सहाय्याने दुसऱ्या खात्यात पैसे जमा करायचा. चौकशीत आरोपीने अशा प्रकारे चार ते पाच खात्यांमधील पैसे काढल्याचा संशय आहे. 

याप्रकरणी आरोपी कर्मचा-याला एक साथीदार असून तो आरोपीला या पासवर्डच्या सहाय्याने दुस-याच्या खात्यातून कसे पैसे काढता येतात. याची माहिती पुरवत होता. याप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोहम्मद मुन्ना अन्सारी(25) असे अटक आरोपीचे नाव आहे. अंधेरी पश्चिम येथील दुध विक्रेता राजेश पटेल यांच्या तक्रारीवरून अन्सारीला अटक करण्यात आली. पटेलने सायबर पोलिसांकडे सप्टेंबर महिन्यात याप्रकरणी तक्रार केली होती. त्याच्या खात्यातून पाच व्यवहारांच्या माध्यमांतून 50 हजार रुपये काढण्यात आले होते. 19 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.

अधिक वाचाः  कोणाचाही राजीनामा मिळालेला नाही, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
 

काही दिवसांनी पटेल यांनी त्यांचा ई-मेल तपासला असता दुस-या यंत्रामधून त्यांच्या ई-वॉलेटमध्ये लॉग इन करण्यात आल्याचा संदेश त्यात आला होता. कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी हा ई-मेल यापूर्वी पाहिला नव्हता.

अधिक वाचाः  तब्बल ७ महिन्यांनंतर मुंबई मेट्रो सुरु, नियमांचं पालन करणं बंधनकारक

बँक खात्याच्या मदतीने अन्सारीला याप्रकरणी अटक करण्यात आली. चौकशीत तो ई-वॉलेट कंपनीत कामाला असून त्याच्याकडे ग्राहकांची यादी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फसणूक झालेल्या ग्राहकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 43(अ), 66 आणि 66(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Employee famous e wallet company arrested Steal customer password hack into account

loading image