चिंतेचे ढग ! मुंबईतील 10 वॉर्डात 500 हून अधिक रुग्ण;  कोरोना रुग्णदुपटीचा कालावधीही 196 दिवसांवर 

चिंतेचे ढग ! मुंबईतील 10 वॉर्डात 500 हून अधिक रुग्ण;  कोरोना रुग्णदुपटीचा कालावधीही 196 दिवसांवर 
Updated on

मुंबई, 12: मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असून रुग्ण दुपटीचा कालावधीही 196 दिवसांवर आला आहे जो काही दिवसांपूर्वी 205 दिवसांवर होता. 

वाढत्या रुग्णसंख्येत 10 वॉर्डात सर्वाधिक म्हणजे 500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात बोरीवली, अंधेरी पश्चिम, कांदिवली, मालाड, अंधेरी पूर्व, मुलुंड, घाटकोपर, भांडुप, धारावी व दादर या विभागाचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने रोजच्या चाचण्यांची संख्या वाढवली असून रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबईत मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. तर  सक्रीय रुग्ण वाढत असल्याने या दहा विभागात अंशतः लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत मंगळवारी हजारापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या सलग बुधवारी व गुरुवारी दीड हजाराच्या पार गेली आहे. त्याआधी सोमवारी मंगळवारी ही आकडेवारी हजारापर्यंत होती. मात्र त्यानंतर मोठ्या फरकाने दीड हजाराच्या पार रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या  दुस-या आठवड्यापासून रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. रोजची आकडेवारी दीड हजाराच्या पार गेल्याने मुंबईकरांच्या चिेंतेत भर पडली आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या विभागात अंशतः लॉ़कडाऊन करावे लागेल असे संकेत मुख्यमंत्री व त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी दिले आहेत. त्यामुळे अशा विभागात पालिका निर्बंध लादण्याची शक्यता आहे. 

प्रभाग - सक्रीय रुग्ण

बोरीवली - 816
अंधेरी पश्चिम - 783
कांदिवली - 700
मालाड - 688
अंधेरी पूर्व - 687
मुलुंड - 611
घाटकोपर - 575
भांडुप - 571
दादर धारावी - 534
ग्रँन्टरोड  - 526

in ten wards there are more than 500 active patients covid doubling rate on 196 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com