
मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE )देशातील अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी पीसीएम या विषयाची अट काढून टाकली आहे, यासाठी नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पीसीएम हे विषय ऑप्शनला टाकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी मिळणार आहे. यामुळे देशभरात रिक्त राहणाऱ्या जागा आणि त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता AICTE कडून व्यक्त करण्यात आली आहे.
देशात आत्तापर्यंत बीई, बीटेक या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत विज्ञान विषयातील फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (पीसीएम) या विषयांची अनिवार्यता काढण्यात आली होती. त्याशिवाय प्रवेश मिळत नव्हते. त्यात देशभरात मागील काही वर्षात अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने अनेक महाविद्यालय बंद पडत होते. त्या पार्श्वभूमीवर AICTE ने हा निर्णय घेतला आहे.
AICTE हे नवे धोरण ज शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू होणार असून यावर अभियांत्रिकीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राध्यापक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. पीसीएम विषय ऑप्शनला टाकणारे विद्यार्थीही अभियांत्रिकीचे प्रवेश घेतील, मात्र यातून गुणवता ढासळली जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संस्थाचालकांनी या धोरणाचे स्वागत केले आहे.
AICTE नव्या धोरणानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावीत सामान्य विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण तर मागास प्रवर्गासाठी किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत. त्याचबरोबर एकूण 14 विषयांची यादीही AICTE जाहीर केली असून यांपैैकी कोणत्याही तीन विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी इंजिनीयरिंग प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
तसेच इंजिनिअरिंगचे पदवी अभ्यासक्रम आणि टेक्नाॅलाॅजी काॅलेजच्या प्रवेशासाठीही पीसीएम विषयांची सक्ती राहिलेली नाही. विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स आणि इतर ब्रीज कोर्स विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, असे AICTE ने स्पष्ट केले आहे.
mumbai compulsion of PCM subjects for engineering removed by AICTE
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.