सायन रुग्णालयात कोवॅक्सीन चाचणीला सुरुवात, आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना टोचली लस

सायन रुग्णालयात कोवॅक्सीन चाचणीला सुरुवात, आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना टोचली लस

मुंबई : जगभरातील देशांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीच्या चाचणीला सायन रुग्णालयात शनिवार 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कॉव्हॅक्सिनची लस एक हजार स्वयंसेवकांना तीन महिन्यात दिली जाणार असून शनिवार ते आतापर्यंत 15 स्वयंसेवकांना कोवॅक्सीनची लस टोचण्यात आल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कॉव्हॅक्सिन चाचणीला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. 

भारत बायोटीक कंपनीने तयार केलेली कॉव्हॅक्सिन लस एक हजार स्वयंसेवकांना दिली जाणार आहे. कॉव्हॅक्सिन लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी बसवत त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले. 

दरम्यान, भारत बायोटेक कंपनीची कॉव्हॅक्सिन लस देण्याआधी स्वयंसेवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लस देण्याआधी लसीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तो स्वयंसेवक तयार झाल्यास त्याची सही घेत लस दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. 

जे.जे. रुग्णालयात 186 स्वयंसेवकांना कोवॅक्सीन - 

क्लिनिकल ट्रायलला राज्य सरकारच्या एथिक कमिटीने परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत 186 जणांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. ICMR च्या नियमांनुसार, प्रत्येक सेंटरमध्ये किमान हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. शिवाय, प्रत्येक क्लिनिकल ट्रायलला विमा दिला गेला आहे. क्लिनिकल ट्रायल दरम्यान स्वयंसेवकांना होणारा किंवा झालेला त्रास पाहून एथिक कमिटी आणि डीसीजीआयची कमिटी त्यावर निर्णय देईल. किमान वर्षभर चालणारी ही प्रक्रिया आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर ने ही लस तयार केली अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील कॉव्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायलचे सह अन्वेषक डॉ. दिनेश धोदी यांनी दिली.

दरम्यान, कॉव्हॅक्सिन लस दिलेल्या स्वयंसेवकांना कुठला त्रास होत आहे का, काही दुष्परिणाम होत नाही ना यावर बारकाईने डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

testing of co vaccine starts in sion hospital 15 volunteers given vaccine under doctors observation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com