तब्बल 14 हजारांहून अधिक कैद्यांची झालीये कोरोना चाचणी, साथ नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या

अनिश पाटील
Tuesday, 22 September 2020

दिलासादायक बाब म्हणजे सहा आठवड्यात एकही मृत्यू नाही

मुंबई :  राज्यातील कारागृहांमधील कोरोनानियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कैद्यांची चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यातील 43 कारागृहांमधील 14 हजारांहून अधिक कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या सहा आठवड्यात एकाही कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

राज्यातील 43 कारागृहांमध्ये सुमारे 36 हजार कैदी आहेत.त्यातील 14 हजार 252 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 31 मे रोजी कारागृहांमध्ये कोरोना पहिला रुग्ण सापडल्यापासून राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या चाचण्या मोठ्याप्रमाणात करण्यात आल्या आहेत.

कारागृहांमध्ये आतापर्यंत 2011 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 6 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर कारागृहमध्ये सर्वाधिक म्हणजे 1366 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात 998 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण आर्थर रोड कारागृहातील  कैद्यांचा आकडा सध्या नियंत्रणात आला आहे.

महत्त्वाची बातमी : भय इथले संपत नाही, कोरोनावरील इंजेक्शनसाठी रूग्णालयांची फरफट

आर्थर रोड कारागृहात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर राज्यभरातील कारागृहांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2011 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहेत. तर कैद्यांसह जैलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीही त्यापासून वाचू शकलेले नाहीत.

कारागृहात काम करणाऱ्या 416 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये मोठ्याप्रमाणात चाचण्या सुरू असल्यामुळे बाधीत कैदी सापडत आहेत. मात्र गेल्या सहा आठवड्यात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेले नाही. 

( संपादन - सुमित बागुल )

testing of more than 14 thousand prisoners done in maharashtra to control pandemic


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: testing of more than 14 thousand prisoners done in maharashtra to control pandemic