ठाण्यातील बाधितांची संख्या वाढत असली तरी, दिलासा देणारी माहिती अशी की...

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असली, तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 106 रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत, तर एक हजार 847 संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असली, तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 106 रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत, तर एक हजार 847 संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने देखील पहिल्या दिवसापासून विविध स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.  जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांव्यतिरिक्त इतर अस्थापना बंद ठेवण्याचाबरोबरच गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केटचे विभाजन करण्यात आले आहे, तरी देखील जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांच्या मनात कोरोनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच, दुसरीकडे जिल्हावासीयांना दिलासा देणारी बाबहीसमोर आली आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांसह दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागातील दोन हजार 872 संशयितांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील कस्तुरबा, जे. जे. रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 847 जणांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर 543 जण बाधित असल्याचे समोर आले. बाधितांचा हा आकडा धडकी भरवणारा असला, तरी त्यापैकी 106 जण या आजारातून ठणठणीत बरे होवून घरी परतले आहेत. 

tests of one thousand 847 suspects negative in thane

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tests of one thousand 847 suspects negative in thane