uddhav thackeray and raj thackeray
sakal
मुंबई
Mumbai Municipal Election : ठाकरे बंधूंची मुंबईत एकच सभा, शाखांना भेटी देण्यावर जोर
BMC Election : महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंच्या तीन सभा घेण्याचे नियोजन शिवसेना (यूबीटी) आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून करण्यात आले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वचननामा जाहीर करीत रणशिंग फुंकल्यानंतर प्रतीक्षा होती ती ठाकरेबंधूंच्या संयुक्त सभांची. मात्र सभांपेक्षा शाखा शाखांना भेटी देऊन जनसंपर्कावर भर देण्याचे शिवसेना(यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात ठरले. त्यामुळे मुंबईत तीनऐवजी आता एकच संयुक्त सभा दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे.
