भाजपला ठाकरे सरकारचा दणका, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची होणार चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपला ठाकरे सरकारचा दणका, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची होणार चौकशी

फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातले आदेश दिल्याचं समजतंय.

भाजपला ठाकरे सरकारचा दणका, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची होणार चौकशी

मुंबईः ठाकरे सरकारनं भाजपला वीज बिलाच्या मुद्द्यावरुन दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातले आदेश दिल्याचं समजतंय. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. 

गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळात वीज बिलांची थकबाकी कशी वाढली याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातले आदेश दिलेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली याबाबतची माहिती सादर केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असून चौकशीचे आदेश दिलेत. 

अधिक वाचा-  भाजप आमदार प्रसाद लाड कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

मनसेकडून सरकारला अल्टिमेटम

वाढीव बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. गुरुवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. यावेळी नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असल्याचं म्हणत सरकारनं दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता, असं नांदगावकर म्हणालेत. तसंच दिलेला शब्द पाळणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा-  करुन तर पहा, म्हणे भगवा उतरविणार; सामनातून भाजपला खडेबोल

वाढीव वीजबिलांवरुन मनसेनं सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत निर्णय घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा धमकीवजा इशारा मनसेनं राज्य सरकारला दिला आहे. वीज बिलात सवलत न देणं हा जनेतचा विश्वासघात आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कापाल, तर याद राखा, असंही मनेसनं म्हटलं आहे.  तसंच काही उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. 

वाढीव वीज आल्यानंतर सामान्य माणसानं आत्महत्या करायची का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन मनसेनं नागरिकांना केलं आहे.

Thackeray government Electricity bill arrears during Fadnavis government investigated

loading image
go to top