ठाकरे सरकारचा फडणवीसांना धक्का; जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी

तुषार सोनवणे
Monday, 18 January 2021

महायुती सरकारची महत्वकांशी अशी जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

मुंबई -  महायुती सरकारची महत्वकांशी अशी जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी तसेच सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने माजी सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली चार सदस्यीय खुली समिती नेमली आहे. ही समिती योजनेतील अनियमितेतेबाबतच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे. याआधीसुद्धा जलयुक्त शिवार योजनीचे चौकशी करण्यास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thackeray governments decided to Open inquiry into Jalayukta Shivar Yojana

-----------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray governments decided to Open inquiry into Jalayukta Shivar Yojana