kalyan dombivli municipal corporation
sakal
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरू असलेल्या राजकीय घोडेबाजाराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (यूबीटी) नगरसेवकांची रविवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही आणि महापालिकेत ठाकरेंचा गट विरोधी पक्षाच्या भूमिकेतच बसणार, असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.