नागरिकांनीच खुला केला ठाकुर्ली उड्डाणपूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

डोंबिवली- डोंबिवलीची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्‍यक असलेला ठाकुर्ली उड्डाणपूल मार्चमध्ये खुला होईल, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. आता जून तोंडावर आला, तरी पुलाचे किरकोळ काम वगळता बाकी काम पूर्ण झाले असूनही हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. अखेर नागरिकांनी या पुलाचा वापर करण्यास सुरुवात करून तो वाहतूकीसाठी खुला केला आहे. 

डोंबिवली पूर्वेकडून पश्‍चिमेला जोडण्यासाठी कोपर हा एकमेव उडडाणपूल असल्याने वाहतुक कोंडीची समस्या उद्‌भवत आहे. त्यामुळे ठाकुर्ली उड्डाणपूल लवकर खुला करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या कामाची पाहणी करत पूल लवकर खुला करण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते; मात्र सर्व नेतेमंडळी पालघर पोटनिवडणुकीत व्यस्त असल्याने पुलाचा लोकार्पण सोहळा लांबला होता. तसेच आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकार्पण सोहळा आणखी लांबणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकीत व्यस्त असलेल्या नेतेमंडळींची वाट बघत बसण्यापेक्षा वैतागलेल्या नागरिकांनीच या पुलाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.  कोपर उड्डाणपूल हा एकमेव पर्याय असल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते. हा त्रास टाळण्यासाठी अनेक जण ठाकुर्ली येथील रेल्वे फाटकातून ये-जा करतात. यामुळे  ठाकुर्ली रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्‍चिमेला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकातून वाहनांना मार्ग काढावा लागतो.

Web Title: Thakurli flyover opened by the citizens only