esakal | वंचित बहुजन आघाडी आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आज राज्यभर थाळीनाद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित बहुजन आघाडी आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आज राज्यभर थाळीनाद आंदोलन

राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन उठवावे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर थाळी नांद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता

वंचित बहुजन आघाडी आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आज राज्यभर थाळीनाद आंदोलन

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एसटी, बेस्ट आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद असल्याने सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन उठवावे अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर थाळी नांद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान राज्यसह मुंबई उपनगरात सुमारे 24 ठिकाणी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

ऍड. प्रकाश आंबेडकर स्वतः वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत नागपूर येथे उपस्थित राहणार असल्याचे वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 'मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

मुंबईत याठीकाणी होणार थाळीनाद आंदोलन
 

दक्षिण मध्य मुंबई     

 • अणुशक्ती नगर, देवनार बस डेपो 
 • चेंबुर - डॉ. बाबाबसहेब आंबेडकर उद्यान बस स्थानक  
 • धारावी /माहीम  - धारावी बस डेपो 
 • वडाळा - वडाळा डेपो 

उत्तर मध्य मुंबई     

 • कुर्ला   -  नेहरू नगर एस. टी.  डेपो 
 • चांदिवली / पार्ले / कलिना /कुर्ला वेस्ट बस स्थानक 
 • खेरवाडी / बांद्रा    - बांद्रा बस डेपो (पूर्व)

उत्तर पश्चिम मुंबई     

 • दिंडोशी    - दिंडोशी बस डेपो
 • गोरेगाव    -  गोरेगाव बस डेपो 
 • जोगेश्वरी     -  मजास बस डेपो 
 • वर्सोवा     - चार बंगला बस डेपो 
 • मारोळ    -  मारोळ बस स्थानक 
 • अंधेरी  - अंधेरी वेस्ट  बस डेपो 

उत्तर मुंबई     

 • बोरीवली /दहिसर  - बोरीवली ईस्ट एसटी डेपो 
 • मागाठाणे  - मागाठाणे बस आगार 
 • कांदिवली/ चारकोप  - पोइसर बस आगार 
 • मालाड    -  मालवणी बस आगार 

दक्षिण मुंबई     

 • मुंबई सेंट्रल  - बस आणि एसटी डेपो 
 • भायखळा   -  महाराणा प्रताप चौक आगार 
 • वरळी    -  दूरदर्शन बस डेपो 
 • कुलाबा - इलेक्ट्रिक हाऊस (बेस्ट समिति अध्यक्ष)
 • ईशान्य मुंबई जिल्हा  - घाटकोपर बस आगार 

नवी मुंबई

 • एरोली   -  एरोली बस डेपो सेक्टर 3 
 • नेरूळ   - नेरूळ बस स्थानक

( संकलन - सुमित बागुल )

thali naad andolan against state government by vanchit bahujan aaghadi

loading image