

Rickshaw Driver
ESakal
ठाणे शहर : महाराष्ट्रात सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असावे, या राज्य सरकारच्या भूमिकेनुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांची विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. शहरातील २ हजार ३१७ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील १४२ चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळून आले.