ठाणे : परदेशातून ठाण्यात परतलेले दोन हजार प्रवासी ‘नॉट रिचेबल’

पालिकेला प्रवाशांचा ‘ताप’
ठाणे : परदेशातून ठाण्यात परतलेले दोन हजार प्रवासी ‘नॉट रिचेबल’

ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत(corona patient) झपाट्याने वाढ होत असताना ठाण्यात परदेशातून परतलेल्या प्रवाशांनी ‘ताप’ वाढवल्याचे समोर आले आहे. शहरात महिन्याभरात परतलेल्या सहा हजारपैकी दोन हजार प्रवासी अजूनही `नॉट रिचेबल` असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा ठावठिकाणा शोधताना पालिका प्रशासनाची (thane carporation)दमछाक होत आहे; तर दुसरीकडे परदेश वारी करून आल्यानंतर कोरोना व ओमिक्रॉनची(omicron) लागण झालेले रुग्ण उपचार घेण्यासाठी सहकार्य करत नसल्याने आरोग्य विभाग (health department)हतबल झाला आहे.

ठाणे : परदेशातून ठाण्यात परतलेले दोन हजार प्रवासी ‘नॉट रिचेबल’
ओमिक्रॉनच्या मुकाबल्यासाठी हवी स्वयंशिस्त : मोदी

गेल्या महिन्यात ठाण्यात(thane) परदेश प्रवास करून सुमारे सहा हजार प्रवासी दाखल झाले. त्यापैकी तीन हजार ५०० जणांची `आरटीपीसीआर` चाचणी(RTPCR Test) करण्यात आली. त्यातील ११ जणांना कोरोनाची(corona) लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक जण ओमिक्रॉन(omicron) बाधित सापडला. घोडबंदर परिसरात राहणारा हा रुग्ण घाना देशातून १४ डिसेंबरला आला होता. १६ डिसेंबरला त्याला ताप आल्याने त्याला पालिकेच्या आरोग्य पथकाने तातडीने पार्किंग प्लाझा येथील कोविड रुग्णालयात(covid hospital) दाखल केले. पण आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याने घरी सोडण्यात यावे यासाठी तो रोज तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालत होता. असेच प्रकार इतर रुग्णांच्या बाबतीतही घडत आहेत. अशा प्रवृत्तींमुळेच कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यातयेत आहे.

प्रोटोकॉल धाब्यावर

परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पालिकेने करावी, कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल करावे. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला घरी पाठवण्यात येऊ नये, असा उपचारांचा राज्य सरकारचा प्रोटोकॉल आहे. पण परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांनी ‘असहकार’ ची भूमिका घेत सर्व प्रोटोकॉल धाब्यावर बसवले आहेत.

ठाणे : परदेशातून ठाण्यात परतलेले दोन हजार प्रवासी ‘नॉट रिचेबल’
भारतीय वस्तूंचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढवायला हवी- पंतप्रधान मोदी

खासगी डॉक्टरांना कारवाईचे ‘इंजेक्शन’

  1. काही होणार नाही, रुग्णालयातही हेच उपचार होणार, तुम्ही घरीच रहा आणि ही औषधे घ्या... सध्या खासगी डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना हे सल्ले दिले जात आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होण्याची संख्या रोडावली असून बहुतेक जण घरीच उपचार घेत आहेत. पण आता हे ओमिक्रॉनच्या बाबतीतही घडत असल्याचे समोर आले आहे.

  2. ओमिक्रॉन धोकादायक नसून तुम्ही घरीच बरे होऊ शकाल, असे सल्ले खासगी डॉक्टरांकडून दिले जात आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, असे सल्ले दिल्यास कारवाईचे इंजेक्शन देणार असल्याची तंबी दिली आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधूनही ही सूचना सर्व खासगी डॉक्टरांपर्यंत पोहचवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com