Thane News: ठाण्यात २७ अनधिकृत शाळांचा भांडाफोड! फसव्या शाळांपासून सावध राहावे, पालकांना शिक्षण विभागाचा इशारा

Unauthorized School List: ठाण्यात २७ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सव्या शाळांपासून सावध राहावे, असा पालकांना शिक्षण विभागाने इशारा दिला आहे.
Unauthorized School List

Unauthorized School List

ESakal

Updated on

ठाणे : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात शासनमान्यता नसतानाही अनेक संस्थांनी अनधिकृतपणे शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले असून, अशा २७ शाळांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. आकर्षक जाहिरातींना बळी न पडता केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच पाल्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com