Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना! १० फूट खड्ड्यात कंटेनर कोसळला, चालकाची सुखरूप सुटका

Container Fall In Pit: ठाण्यात दहा फूट खड्ड्यात कंटेनर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
Container Accident In thane

Container Accident In thane

ESakal

Updated on

ठाणे : घोडबंदर रोडवरील दोस्ती इम्पेरिया समोर मेट्रो प्रकल्पासाठी खोदलेल्या १० फूट खोल खड्ड्यात कंटेनर कोसळून चालक अडकल्याची घटना रविवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाने १५ मिनिटांत त्या चालकाची सुखरूप सुटका केली. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती आपत्ती कक्षेने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com