Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Eknath Shinde:  ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Thane Loksabha News: महायुतीतील ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड राखण्यात यश आले असून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवाय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कल्याणमधून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. डॉ. श्रीकांत शिंदे यांची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Eknath Shinde:  ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत
Thane News: उल्हासनगर पोलीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये ; राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार

मात्र शिवसेनेकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी आज डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रदिनी ही उमेदवारी म्हस्के जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे ठाण्यात आता महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे आणि महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात थेट सामना रंगणार असला तरी खरी लढत दोन्ही शिवसेनेत असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघावरून गेल्या महिनाभर चर्चेचे गुऱ्‍हाळ सुरू होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधी ठाण्यात महायुतीचा पहिला महामेळावा झाला.

या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार व आपण सर्व ‘नमो सैनिक’ असा पहिला नारा नरेश म्हस्के यांनी दिला होता. या वक्तव्‍यावर शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज झाले होते; पण ‘नमो सैनिक’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचल्याने नरेश म्हस्के यांचा उमेदवारीसाठीचा मार्ग प्रशस्त झाला, असे समजते.

Eknath Shinde:  ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत
Thane News: वाढत्या तापमानाचा ठाणेकरांना फटका; १९ जण बाधित

कल्याणमधून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी केली.

महायुतीचा उमेदवार तर ठरला होता; परंतु अधिकृत घोषणा होत नसल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने आपला दावा सांगण्यास सुरुवात केली होती.

यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत होणार आहे. खासदार शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा सामना कसा रंगतो, हे पाहावे लागेल.

Eknath Shinde:  ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत
Thane News : ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची ब्रदर्स अन् दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण; डॉक्टर, कर्मचारी आक्रमक

भीती वाटत नाही : नरेश म्हस्के

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली. हे फक्त शिवसेनेत होऊ शकते. याशिवाय आमचे काम हे ३६५ दिवस सुरू असते. त्यामुळे भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.

...

दोन्ही जागा जिंकू : खासदार श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, महायुतीच्या या दोन्ही जागा प्रचंड बहुमताने निवडून येतील. हा पूर्ण जिल्हा बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे.

Eknath Shinde:  ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत
Thane News: शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, रद्द करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com