

Thane Banner Collapse
ESakal
ठाणे : ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका येथील पादचारी पुलावर लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळल्याची घटना रविवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील बेकायदा बॅनरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.