

Thane-Belapur Road Closure
ESakal
नवी मुंबई : ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पांतर्गत ठाणे-बेलापूर मार्गावर पुलाचे गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम एमएमआरडीएकडून हाती घेतले आहे. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून ४ ऑक्टोबर तसेच ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान रात्री ११ ते ते सकाळी ६ या वेळेत ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणार आहे.