Mumbai News: ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी बोगदा वाद न्यायालयात; समिती स्थापन होण्याची शक्यता

Thane-Borivali Twin Tunnel: ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी बोगद्यांच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. यामुळे हा वाद न्यायालयात गेला असून या प्रश्नी समिती गठित करण्याचे न्यायालयाने संकेत दिले आहेत.
Thane-Borivali Twin Tunnel Controversy

Thane-Borivali Twin Tunnel Controversy

ESakal

Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे ते बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्यांच्या प्रकल्पासाठी रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृहाला स्थानिक रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेची दखल घेऊन गुरुवारी (ता. १२) उच्च न्यायालयाने या प्रश्नी समिती गठित करण्याचे संकेत दिले. त्यासाठी याचिकाकर्त्यांसह सर्व प्रतिवाद्यांना प्रत्येकी एका तज्ज्ञ व्यक्तीचे नाव सुचविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com