Thane Rain: लघुशंका करायला गेला अन् अनर्थ घडला...; पावसाने तरुणाचा बळी घेतला!

Monsoon Update: अंबरनाथ येथे काल रात्री एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भर पावसात लघुशंका करत असताना विजेचा करंट लागून मुलाचा मृत्यू झाला.
Boy die due to rain in ambernath
Boy die due to rain in ambernathESakal
Updated on

अंबरनाथ ता. २१ (वार्ताहर) : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. एकीकडे उन्हाच्या काहिलीपासून त्रासलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे याच पावसाचा अनेकांना जोरदार फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याच्या बातमी समोर येत असताना विजेचा धक्का लागून एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम येथील नवीन भेंडी पाडा परिसरात ही घटना घडली. पाऊस सुरू असताना लघुशंका करायला गेलेल्या एका मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. विघ्नेश अनिल कचरे (वय १६) असे मृताचे नाव आहे. विघ्नेश कचरे काल रात्री पाऊस सुरु असताना लघुशंका करण्यास गेला. यावेळी विजेच्या खांबाला स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

Boy die due to rain in ambernath
Mumbai News: मुंबईत वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या पतीला अटक, ED च्या तपासातून धक्कादायक खुलासे! नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. विघ्नेशला तत्काळ उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com