
ठाणे : शहरासह जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाचा जोरदार उत्साह असताना, नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रस्त्यांमध्ये उभारलेल्या दहीहंडी मंडपांमुळे अनेक मार्ग वाहतूक पोलिसांनी बंद केले; पण ठाणे स्थानकापासून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कोंडीची अवस्था झाली. गोविंदा पथकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केल्याने कोंडीत आणखी भर पडली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर शहरांमध्ये लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी आयोजित करण्यात आल्या. यंदा बाईक आणि स्कूटीवरून येणाऱ्या गोविंदांची संख्या विशेष वाढल्याचे दिसले.