

Thane Coastal Road
ESakal
मुंबई : ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या पायाभरणी कामांपैकी ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून पिअर कॅप आणि आय-गर्डर उभारणी सुरू आहे. त्यामुळे ठाणे आणि परिसरातील वाहतुकीला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.